नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावली आहे. यामुळे काँग्रेस रविवारी (ता. १२) देशभरात पत्रकार परिषद घेणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
सोनिया यांना यापूर्वी ८ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, सोनिया यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीकडे नवीन तारीख मागितली होती. सोनिया गांधी यांना दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर(ईडी) हजर राहण्यासाठी २३ जूनची तारीख देण्यात आली आहे. जिथे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत जबानी नोंदवली जाईल. याप्रकरणी राहुल गांधी यांचीही १३ जून रोजी चौकशी होण्याची शक्यता आहे. राहुल यांना यापूर्वी २ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते परदेश दौ-यावर असल्याने नवीन तारीख मागितली होती. ईडीने त्यांना १३ जून रोजी समन्स बजावले आहे.