22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयपेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार

पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंधन दरवाढीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. अशातच पेट्रोल-डिझेल १०० पार आणि इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचे म्हणत धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने २०१४ पूर्वी आॅईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे ८० टक्के तेल बाहेरून आयात करावे लागते, असेदेखील धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे़

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परस्परांशी स्पर्धा करू लागल्या आहेत. पेट्रोलने शंभरी कधीच पार केली आहे. तर काही ठिकाणी नव्वदीत असलेले डिझेलही शतक झळकावण्याच्या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे. पुढील वर्षापर्यंत कच्चे तेल १०० डॉलर प्रतिबॅरेल एवढे महाग असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याच दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

नेहमी नवे कारण समोर
धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचे नवे कारण सांगितले होते़ प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.

पावसाळी अधिवेशन दोनच दिवसाचे होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या