28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयसचिन पायलट यांचं बंड मोडण्यात काँग्रेसला यश

सचिन पायलट यांचं बंड मोडण्यात काँग्रेसला यश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – सचिन पायलट यांचं बंड मोडण्यात काँग्रेसला यश आलं आहे. पायलट यांनी आज दुपारी १ च्या दरम्यान राहुल गांधी यांची भेट घेत त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली होती. यानंतरच पायलट यांचेबंड मोडण्यात काँग्रेसला यश आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता याबाबत काँग्रेसतर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

‘पायलट यांनी राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये आपण काँग्रेस पक्ष व राजस्थानातील काँग्रेस सरकारमध्ये आपलं काम सुरु ठेवणार असल्याची ग्वाही दिली.’ असं काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं.याबाबत अधिक माहिती देताना वेणुगोपाल म्हणाले, ‘या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांनी उपस्थित केलेल्या समस्यांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अहवालानंतर योग्य ती पावले उचलण्यात येतील.’

फेसबुकवरुन आत्महत्येची पोस्ट; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या