22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयकाँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली; आणीबाणीवरून मोदींचा निशाणा

काँग्रेसने लोकशाही पायदळी तुडवली; आणीबाणीवरून मोदींचा निशाणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्षे झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसवर टीका केली आहे. देशात २५ जून १९७५ रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी जवळपास २१ महिने म्हणजेच २१ मार्च १९७७ पर्यंत लागू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, आणीबाणीचे काळे दिवस कधीच विसरता येणार नाहीत.

१९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थानांचा विद्ध्वंस झाला. आपण भारताच्या लोकशाहीची भावना भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. असे आवाहनही मोदींनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर भाजपच्या इन्स्टाग्राम अकाउंटची एक लिंक शेअर करताना म्हटले की, काँग्रेसने आपल्या लोकशाहीला अशा प्रकारे तुडवले. आम्ही त्या सर्व महान लोकांचे स्मरण करतो ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि भारताच्या लोकशाहीचे संरक्षण केले.

अहंकाराच्या भावनेतून आणीबाणी
भाजपच्या अनेक नेत्यांनी आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही काही ट्विट केली आहेत. यात म्हटले की, १९७५ मध्ये आजच्या दिवशी काँग्रेसने सत्तेसाठी आणि अहंकाराच्या भावनेतून देशावर आणीबाणी लादली. या कृतीने जगातील सर्वात मोठया लोकशाहीची हत्या केली होती असेही शहा यांनी म्हटले.

लोकशाहीवरचा हा काळा डाग : नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले की, १९७५ मध्ये आजच्याच दिवशी काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी आणीबाणीची घोषणा केली होती. भारताच्या महान लोकशाहीवरचा हा काळा डाग आहे. आणीबाणीला विरोध करणाºया सर्व महान लोकांना प्रणाम. अत्याचार सहन केला पण त्यांनी लोकशाहीची मूल्ये जपली.

डेल्टा व्हेरिएंट विक्राळ रूप धारण करतोय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या