27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयकाँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष हवा

काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष हवा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्षाची गरज असल्याच विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केले असून, पक्षातील माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पंजाब काँग्रेसमध्ये सध्या दुफळी निर्माण झाली आहे. कॅप्टन अमरिंदरर सिंग यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. त्यात काँग्रेसला अजूनही कायमस्वरुपी अध्यक्ष प्राप्त झालेला नाही. याबाबत शशी थरूर यांनी महत्त्वाचे विधान केले.

इडुक्की जिल्ह्यातील थोडुपुझामध्ये आयोजित एका पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शशी थरूर यांनी महत्त्वाची नोंद केली. सोनिया गांधी यांनी इतक्या वर्षांपासून पक्षाचे यशस्वीरित्या नेतृत्त्व केले आहे. त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचे काम केले आहे. पण त्यांनी आता स्वत: आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. अशातच आता पक्षाला नव्या अध्यक्षाची नेमणूक करायची गरज आहे, असे थरूर म्हणाले.

तर आम्हाला पर्याय शोधावा लागेल
राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्त्व करावे अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. पण ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला अध्यक्षपदासाठी पर्याय शोधावा लागेल. कारण पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्षपदाची गरज आहे आणि या प्रक्रियेला आता गती येणेदेखील गरजेचे आहे, असेही थरूर म्हणाले.

यूवक काँग्रेसने केली राहुल गांधींची मागणी
नुकतेच युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांनाच पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी केली गेली आहे. गोव्यात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत युवा काँग्रेसकडून राहुल गांधी यांची काँग्रेसच्या कायमस्वरुपी अध्यक्षपदी निवड करावी अशा मागणीचा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या