22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयराजस्थानच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलनाचा कॉंग्रेसचा इशारा

राजस्थानच्या मुद्यावर देशव्यापी आंदोलनाचा कॉंग्रेसचा इशारा

एकमत ऑनलाईन

सर्व राज्यांच्या राजभवनाला घेरणार

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचमध्ये राज्यपाल आणि कॉंग्रेसमधील संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. सर्व राज्यांच्या राजभवनाला काँग्रेस २७ जुलैला म्हणजे सोमवारी घेराव घालणार आहे. जयपूरच्या राजभवनालाही घेराव घालण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.
कॉंंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात ट्विट करून दुजोरा दिला. लोकशाहीच्या हत्येविरोधात काँग्रेस देशभरातील राजभवनांना घेराव घालणार, असे वेणुगोपाल म्हणाले. देशातील निवडलेले सरकार पाडण्यासाठी भाजप घटनात्मक संस्थांचा सतत वापर करीत आहे. याचा निषेध म्हणून, कॉंग्रेस पक्ष उद्या स्पीक फॉर डेमॉक्रसी अशी देशव्यापी आॅनलाइन मोहीम आयोजित केली आहे, असे वेणुगोपाल म्हणाले.

राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाला भाजपला जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह १९ काँग्रेस १९ बंडखोर आमदारांच्या आक्रमकतेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सचिन पायलट आणि भाजपच्या संगनमतामुळे राज्यात हे राजकीय संकट उद्भवल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

मोदींच्या निवासस्थानासमोर करणार निदर्शने : गहलोत
राजस्थानच्या बाबतीत भाजपाचे कोणतेही कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी आपल्याला राष्ट्रपती भवनापर्यंतही जावे लागले तरी चालेल, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले. तसंच गरज भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरही निदर्शने करू, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आयोजित केलेल्या एका बैठकीदरम्यान ते बोलत होते.

Read More  बारावी गुणपत्रिकांचे महाविद्यालयातून होणार वितरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या