25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयराष्ट्रीय लॉकडाऊनचा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

राष्ट्रीय लॉकडाऊनचा विचार करा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीनंतर स्पष्ट झाले होते. पंरतु, आता कोरोना महारोगराईचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र तसेच, राज्य सरकारांनी लॉकडाउनच्या पर्यायावर विचार करावा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. कोरोना संंबंधीत याचिकांवर न्यायमूर्ती डी. व्हाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एल़ नागेश्वर राव तसेच न्यायमूर्ती रविंद्र भट यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमक्ष सुनावणी सुरू आहे.

सरकारने सार्वजनिक कार्यक्रम तसेच कोरोनाचे सुपर-स्प्रेडर ठरणा-या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आग्रह देखील न्यायालयाकडून करण्यात आला. लॉकडाउनमुळे गरीबांवर होणा-या दुष्प्रभावार देखील न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सरकारने लॉकडाऊन लावला तर, वंचितांसाठी अगोदरपासून विशेष प्रावधान करण्याची सूचना न्यायालयाकडून करण्यात आली आहे. देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनचे संकट गडद होत आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना लसीची उपलब्धता तसेच किंमत प्रणाली, आवश्यक औषधी योग्य दरावर उपलब्ध करवून देण्यासंबंधी न्यायालयाचे निर्देश तसेच प्रोटाकॉलचे पालन करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

पुढील सुनावणीत उत्तर सादर करणार : केंद्र
केंद्र-राज्य सरकारांनी एकत्रितरित्या काम करावे कोरोना महारोगराईच्या दुस-या लाटेमुळे केंद्र तसेच राज्य सरकारने मिळून याचा सामना करण्याची योजना आखली पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. जोपर्यंत कुठलेही ठोस धोरण बनवले जात नाही तोपर्यंत कुठल्याही रूग्णाला रूग्णालयात भरती करवून घेण्यासह आवश्यक औषधी देण्यास नकार दिला जावू नये. ओळखपत्र नसेल तरी रूग्णाला रूग्णालयात दाखल केले पाहिजे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत भारतात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या