लडाखमधील सीमेवर देशाकडून विमान धावपट्टीची निर्मिती

- टी-७२, टी-९० रणगाडे सीमेवर दाखल

0
383

श्रीनगर : चीनबरोबर लडाख भागात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात विमानांसाठी आपत्कालीन धावपट्टीनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. ही धावपट्टी लढाऊ विमानांसाठीही उपयुक्­त ठरू शकते.

अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरामध्ये ३़५ किलोमीटर लांबीची ही आपत्कालीन धावपट्टी तयार करण्यात येत आहे. त्याचे काम सुरूही झाले आहे. या कामात सहभागी असर्णा­या लोकांना पासेसही जारी केले आहेत. विमानाच्या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी घेण्याची कोणतीही गरज नसल्याचे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील या धावपट्टीचा चीनबरोबर सुरू असलेल्या अलीकडच्या चकमकींशी कोणताही संबंध नसल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये नवीन महामार्गाच्या निर्मितीचे काम सुरू असतानाच ही योजना आखण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन जारी झाल्याने हे काम सुरू करता आले नव्हते, असे एनएचएआयच्या अधिर्का­याने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. काश्मीर खो-यातील ही तिसरी धावपट्टी ठरणार आहे. यापूर्वीच्या दोन धावपट्ट्या अवंतीपोरा आणि श्रीनगरमध्ये आहेत.

Read More  भारताने आगीशी खेळू नये!

चीनचे सैन्य लडाखमध्ये कसे आले?
लडाखमध्ये चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पाश्र्­वभूमीवर लडाखच्या पूर्व भागात चिनी सैन्याच्या बांधकामावर एक सविस्तर अहवाल देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी केंद्र सरकारला सादर केला आहे. लडाखच्या पूर्व भागात चिनी सैनिक कसे पोहोचले, याचीही सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

सीमेवर रणगाडे, बोफोर्स तोफा
सीमेवरील तणाव मिटविण्यासाठी सैन्य आणि राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू असतानाही चीनचे सैन्य आपल्या स्थानावरून मागे हटण्यास तयार नाही. चीनने सीमेवर आपल्या सैनिकांबरोबरच शस्त्रास्त्रे, रणगाडे आणि तोफखान्यांचीही तैनाती वाढविली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पूर्ण तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून टी-७२, टी-९० रणगाडे आणि बोफोर्स तोफा लडाख सीमेवर पाठविल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Comment moderation is enabled. Your comment may take some time to appear.