24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयनक्षल कनेक्शनवरून वादंग!

नक्षल कनेक्शनवरून वादंग!

एकमत ऑनलाईन

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील कथित नक्षलवादी कनेक्शननंतर नक्षलवादीसंबंधी खळबळ उडाली आहे. त्यासाठी एसआयटीची टीम मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणा-या महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान, नक्षलवादी असल्याचा आरोप केल्याबद्दल प्राध्यापक डॉ. राजकुमारी बन्सल यांनी माध्यमांसमोर जबाब दिला आहे. ती म्हणाला की, माझा काही संबंध नाही, मी केवळ आत्मीयता म्हणून हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या घरी गेली.

राजकुमारी बन्सल यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबाला आवडले आहे की आपल्या समाजातील एक मुलगी दूरवरून आली आहे, म्हणून ते म्हणाले दोन दिवस थांब, मग मी थांबले. ती म्हणाला की, मला पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक मदत करायची आहे. ती फक्त तिच्या पतीला सांगून गेली. दुसरीकडे एसआयटीच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत या महिलेने आधी पुरावे सादर करा. तेथे बोलणे आणि आरोप करणे खूप सोपे आहे, असे म्हटले आहे.

पेशाने वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक राजकुमारी बन्सल म्हणाली की, माझ्या मोबाईल नंबरसोबत छेडछाड केली जात आहे, असे मला वाटते. मी तातडीने सायबर पोलिसांना कळविले. ही गोष्ट माझ्या प्रतिष्ठेची बाब आहे. मला कसे नक्षलवादी म्हटले जाते. पुढे ती म्हणाली की, मी फॉरेन्सिक अहवाल बघायला गेले, कारण मी त्या विषयाची तज्ज्ञ आहे. आरोपी महिला म्हणाली की, मी कधीच वहिनी बनून मुलाखत दिली नव्हती, मी म्हणाले की मी एक मुलगी आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे.

कॉल डिटेलमध्ये अनेक खुलासे
घटनेच्या २ दिवसानंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती कुटुंबातील सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेची वहिनी बनलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्याच्या कॉल डिटेलमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

वहिनी बनून कट रचल्याचा पोलिसांचा दावा
एसआयटीच्या चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत पीडित मुलीच्या घरात राहून नक्षलवादी महिला मोठे षडयंत्र रचत होती. याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत.

‘ती’ नक्षलवादी महिला पोलिसांशीही बोलली?
हाथरस घटनेची चौकशी करत एसआयटीच्या सूत्रांनी उघड केले की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलिस आणि एसआयटीशी बोलत होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या