18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीय‘भारत माता की जय’ घोषणेवरून वाद

‘भारत माता की जय’ घोषणेवरून वाद

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्यप्रदेशातील एका शाळेत भारत माता की जयच्या घोषणा देण्यावरून वाद झाला. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील अगर मालवा जिल्ह्यातील बडोद येथील शाळेत मंगळवारी ही घटना घडली. याप्रकरणी २० जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.

बडोद येथील खासगी शाळेतील ही घटना असून, विद्यार्थी शाळेत प्रार्थना म्हणत होते. त्यानंतर भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. काही मुस्लीम सुमदायातील विद्यार्थी मात्र भारत माता की जयच्या घोषणा देत नव्हते. त्यावेळी भारत राजपूत या विद्यार्थ्याने त्याच्यावर आक्षेप घेतला. त्याचे रुपांतर वादामध्ये झाले. राजपूत आणि त्याचे शिक्षक दोघेही शाळेतून परतत असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, अशी तक्रार राजपूतने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजपूतने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बडोदच्या कसाई मोहल्ला परिसरातील काही मुस्लिम मुले आणि त्यांच्या मित्रांनी त्याला, शाळेतील विद्यार्थी आणि अनुसूचित जातीतील एका शिक्षकाला अडवले. त्यानंतर भारत माता की जयच्या घोषणेबाबत विचारणारे ते कोण आहेत? अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. उपस्थित शिक्षक या घटनेचा व्हीडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करत होते. मात्र, त्यांना देखील काठीने मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडण्यात आला, असा आरोप राजपूतने केला.

अनेक जण अटकेत
कायदेशीर गुन्ह्यापेक्षा योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शनाचा हा मुद्दा आहे. कारण यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना नैतिक धडे दिले पाहिजेत. तक्रारीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली प्राणघातक हल्ला आणि दंगली आणि एससी-एसटी कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी ९ ओळखीचे आणि ८-१० अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि या प्रकरणाच्या चौकशीनंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, असे पोलिस अधीक्षक राकेश सागर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या