23.1 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयहिंदू मुलीशी विवाहासाठी मुस्लिम तरुणाचे धर्मांतर

हिंदू मुलीशी विवाहासाठी मुस्लिम तरुणाचे धर्मांतर

एकमत ऑनलाईन

यमुनानगर: हिंदू मुलीसोबत विवाह करण्यासाठी आपला धर्म बदलणा-या एका मुस्लिम युवक आणि त्याच्या पत्नीला पंजाब आणि हरयाणा उच्चन्यायालयाने दखल घेतल्यानंतर पोलिसांनी संरक्षण दिले आहे. यमुनानगर पोलिस अधीक्षक कमलदीप यांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली. कमलदीप म्हणाले की , २१ वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणीने ९ नोव्हेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला होता. तरुणाने विवाहानंतर आपला धर्म व नाव देखील बदलले होते. दांपत्याने त्यानंतर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आपल्याला मुलीच्या कुटुंबीयांपासून जीवाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला धोका असल्याचे तरुणाने याचिकेत म्हटले आहे. आपल्या विवाहाला विरोध करणे म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत प्राप्त झालेल्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचेही मत दांपत्याने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत मांडले आहे.

पोलिसांकडून कुटुंबियांचे मन वळवण्याचा प्रयत्न
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत दोघांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिसांनी त्यांना यमुनानगरच्या सुरक्षागृहात पाठवले. गेल्या काही दिवसांपासून हे विवाहित तरुण-तरुणी या सुरक्षागहातच राहात आहेत. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला. हे दोघे आता कायद्याने विवाहीत असून दोघांच्या इच्छेनुसार त्यांना आता सोबत राहता आले पाहिजे, असे पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना सांगितल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
हरियाणातील भाजप सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा तयार करण्यासाठी तीन सदस्यीय समितीचे गठन केले आहे, मात्र अशा ज्याप्रकरणात लग्नासाठी मुस्लिम व्यक्ती धर्मांतर करुन हिंदू बनते, त्याबद्दल भाजपची भुमिका कशी असेल, असे विचारले जात आहे.

ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीचे निदर्शने

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या