18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeराष्ट्रीयपाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत सहकाराचा वाटा महत्वाचा

पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत सहकाराचा वाटा महत्वाचा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दुर्लक्ष करण्याची वेळ गेली आता प्राधान्याने काम करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातील सर्व सहकार मंत्र्यांना केले. तसेच मोदींनी दाखवलेल्या देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यात सहकार क्षेत्राचा महत्वाचा वाटा असेल, असेही शहा म्हणाले. केंद्रीय सहकार खात्याची निर्मिती झाल्यानंतर आयोजित देशातील पहिल्या सहकार संमेलनात ते बोलत होते.

शहा म्हणाले, देशाच्या विकास सहकारितेच महत्वाची भूमिका आहे. पण अद्याप अनेक ध्येय गाठणे अद्याप बाकी आहे. आपल्याला सहकार क्षेत्राकडे नव्या दृष्टीकोनातून पहावं लागेल. आपल्या कामाचा आवाका वाढवावा लागेल. कामामध्ये शिस्त आणि पारदर्शीपणा आणावा लागेल. देशातील कोट्यवधी शेतकरी, गरीब, मागास, दलित, गरीब उपेक्षित महिला यांच्या विकासाचा मार्ग केवळ सहकारितेच्या मार्गानंच काढता येईल, यासाठी इतर कुठलाही मार्ग नाही. काही लोक सहकारितेच्या प्रासंगितकतेवर प्रश्न उपस्थित करतात. त्यांना वाटते सहकारिता आंदोलन आता महत्वाचे राहिलेले नाही. पण मी मोठ्या विश्वासाने सांगू इच्छितो की, सहकारिता आंदोलन सर्वात जास्त प्रासंगिक कधी होते तर ते आत्ता आहे. गाव समृद्ध बनवणे आणि समृद्ध गावाने देश समृद्ध बनवणे हेच सहकारितेची भूमिका राहिली आहे. एकत्र येऊन एकाच दिशेने काम करत राहणे हीच सहकारीता आहे.

मी कायम म्हणत आलोय की आपली आर्थिक ताकद कमी असली तरी सहकारितेच्या माध्यमातून आपण ती इतकी मोठी करु शकतो की त्याला कोणी आव्हान देऊ शकणार नाही. मोदींनी आपल्याला एक मंत्र दिला आहे. सहकारितेतून समृद्धीकडे मोदींनी देशासमोर ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सहकारिता क्षेत्र खूप मोठी भूमिका बजावू शकेल. भारतीय जनतेच्या स्वभावात सहकारिता पूर्णपणे मिसळून गेली आहे. हा भारतीयांच्या संस्काराचाच भाग असून ही उधार घेतलेली संकल्पना नाही. आपल्या कामामध्येच सहकारीता रुजली आहे. त्यामुळे भारतात सहकारिता आंदोलन कधीच मागे पडणार नाही. सहकारी आंदोलनाने देशाला अनेक मोठ्या संकटातून बाहेर काढण्याचे काम केले आहे, असेही यावेळी शहा म्हणाले.

सहकार क्षेत्राच्या निर्मात्यांची काढली आठवण
सहकारीता भारतसाठी नवी नाही. १९०४ पासून आजपर्यंत अनेक चढउतार आपण पाहिले आहेत पण सहकारितेचे महत्व कमी झालेले नाही. या निमित्त सहकारिता आंदोलनाला बळ देणारे माधवराव गोडबोले, वैकुठंभाई मेहता, त्रिभूवनदास पटेल, विठ्ठलराव विखे-पाटील, यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ आणि लक्ष्मणराव इनामदार यांच्यासारख्या अनेक लोकांची मी यानिमित्त प्रणाम करतो आणि या सहकारी आंदोलनाला पुढे नेण्याचे आवाहन करतो, अशा शब्दांत शहा यांनी देशातील पहिल्या सहकार संमेलनात राज्यांना आवाहन केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या