नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनावर मात करणा-यांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. देशात आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत ७४ हजार ८९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशभरात कोरोनावर मात करणाºयांची संख्या ५० लाख १६ हजार ५२० वर पोहोचली आहे. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनातून बरे झालेले दिसून आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
२४ तासांत ८२ हजार १७० नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ वर पोहोचली आहे. यात ५० लाख १६ हजार ५२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या देशात ९ लाख ६२ हजार ६४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ९५ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात ११ हजार नवे रुग्ण, तर १९ हजार रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात गेले काही दिवस दररोज २० हजारांवर नवीन कोरोनाबाधितांची भर पडत असताना आज हा आकडा कमी झाला आहे. आज ११ हजार ९२१ नवीन रुग्ण सापडले आहेत, तर कोरोनामृतांचा आकडाही कमी झाला असून, ही दिलासादायक बाब आहे. आज एकाच दिवशी १९ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख ४९ हजार ९४७ इतकी झाली आहे. त्याचबरोबर राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे. आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७. ७१ इतके झाले आहे.
ज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३ लाख ५१ हजार १५३ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ चाचण्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात १८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनामृतांचा आकडा ३५ हजार ७५१ इतका झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ६५ हजार ०३३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील मृत्यूदर २. ६५ टक्के इतका आहे.