27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकोरोना वाढतोय, गाफील राहू नका; केंद्र सरकारचे राज्यांना पुन्हा पत्र

कोरोना वाढतोय, गाफील राहू नका; केंद्र सरकारचे राज्यांना पुन्हा पत्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांचा उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना गाफील राहू नये अशी सूचना दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.

त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये आणि परिस्थितीविषयी दिरंगाई करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, जसे आपण आत्तापर्यंत करत आलो आहोत, असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रात संसर्गाचा वेग अधिक
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रसाराचा वेग पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला असून येथे कोरोना संसर्गाचा वेग अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,८१३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे सर्वाधिक सक्रीय रूग्णांची नोंद मुंबई आणि त्यापाठोपाठ ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७०२ नवीन रुग्ण आढळले आहेत.

तर, दुसरीकडे देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७२४० नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात ५२३३ नवे रुग्ण आढळले होते. याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी ३७४१ नवे बाधित आढळले होते. त्यानंतर देशात सलग दुस-या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बुधवारी ९४ दिवसांनंतर देशातील नवीन बाधितांची संख्या ५००० च्या पुढे गेली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या