22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू

कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

रायपूर : कोरोना महामारीचे संकट नक्षलवाद्यांवर गडद होताना दिसत आहे. बस्तरमध्ये अनेक नक्षली कारवाया करणारा खतरनाक माओवादी माडवी हिडमा यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बस्तरमधील जंगलात त्याची कोरोनाविरुध्द लढाई सुरु असल्याचे म्हटले आहे. हिडमा हा माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असून, त्याच्यावर सरकारने २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. याबाबत बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज यांनी यास दुजोरा देताना सांगितले की हिडमाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून तो आजारी आहे. हिडमा व्यतिरिक्त अनेक मोठे नक्षली कोरोनाबाधित आहेत. हिडमासह या सर्वांनी शरणागती पत्करली तर आम्ही त्यांच्यावर वैद्यकिय उपचार करू.

कोण आहे माडवी हिडमा
बस्तर जिल्ह्यातील पूवर्ती गावचा रहिवासी असलेला माडवी हिडमा हा गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. त्यावेळी या भागात सक्रिय असलेला माओवादी बदरन्नाने हिडमा याचे वर्तन पाहून नक्षलवाद्यांच्या बाल संघममध्ये भरती केले. हिडमाचे पुढील शिक्षण नक्षली शाळेत झाले. हिडमाची पिळदार शरीरयष्टी पाहून नक्षलींनी त्याला एलओएस ग्रुपमध्ये सामील करुन घेतले.

हिडमा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य
हिडमाने आखलेल्या योजनांमुळे नक्षलवाद्यांना मोठे यश मिळाले. तो नारायणपूर, विजापूर आणि गडचिरोली भागात अनेक वर्षे सक्रिय होता. त्याला मोठया नक्षली नेत्यांनी कोटा एरिया कमिटीच्या जॉईंट प्लाटून चा कमांडर बनवले. त्याने २००७ ते २०२१ या कालावधीत मोठ्या नक्षली कारवाया केल्या. सध्या हिडमा नक्षलींच्या मिल्ट्री बटालियन नंबर १ चा कमांडर आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य आहे.

न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या