32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयलग्न ठरले कोरोना मेळावा

लग्न ठरले कोरोना मेळावा

२८ व-हाडींना लागण ; नवरी सोडून संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

डेहरादून : कोरोनाच्या संसर्गाची दाहकता केवढी प्रचंड आहे याची उदाहरण नुकतेच डेहराडूनमध्ये घडले. सोहळ्यात सामील झालेल्या तब्बल २८ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकटी नवरीच निगेटिव्ह राहिली आहे. कोरोनाबाधित दोघा व-हाडींचा मृत्यूही झाला आहे. डोईवाला येथे ३ डिसेंबरला पार पडलेले हे लग्न कोरोनाचे सुपर स्प्रेडर फंक्शन ठरले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वरासह २८ जणांना कोरोना चा संसर्ग झाला आहे. विशेषत: मुलाचे आई-वडील, बहीण, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि वधूची आजी अशा सर्वांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या आरोग्य विभागाचे अधिकारी लग्नात सामील झालेल्या सर्वांचा संपर्क साधत असून आणखी प्रसार होऊ नये,यासाठी प्रयत्न सुरु आहेत.नव-या मुलाचे काका थेट रुग्णालयातून लग्नासाठी आले होते. तेच या संसर्गाचे स्त्रोत असू शकतात असा संशय आहे.

अ‍ॅपलने मागितली कर्मचा-यांची माफी; विस्ट्रॉनकडून कर्मचा-यांच्या थकीत वेतनाची चूक मान्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या