37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात कोरोना निर्बंध शिथिल होणार

कर्नाटकात कोरोना निर्बंध शिथिल होणार

एकमत ऑनलाईन

बंगळुरु : कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे
संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, राज्यात लागू केलेले निर्बंध, वीकेंड आणि रात्रीचा कपर्यू हटवण्यासाठी २१ जानेवारीला तज्ज्ञांचा सल्ला घेउन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बोम्मई यांनी म्हटले आहे.

देशात कोरोनाच्या तिस-या लाटेत लेकांना ताप आणि खोकला येत आहे. लोक रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले. लोक कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपला दैनंदिन व्यवसाय करू शकतात. तज्ज्ञांच्या समितीला लोकांच्या भावना अवगत करण्यात आल्या आहेत. समिती राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे, असेही बोम्मई यांनी म्हटले 3महे. बोम्मई यांच्या या विधानानंतर कर्नाटकात लवकरच कोरोना निर्बंध शिथिल होण्याची चर्चा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या