24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयपद्मनाभस्वामी मंदिरातील १० पुजा-यांना कोरोना

पद्मनाभस्वामी मंदिरातील १० पुजा-यांना कोरोना

एकमत ऑनलाईन

तिरुवनंतपुरम : केरळच्या तिरुवनंतरपुरमच्या प्रसिद्ध पद्मनाथस्वामी मंदिरातील काही पुजारी शुक्रवार दि़ ९ आॅक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर भाविकांसाठी मंदिरात १५ आॅक्टोबरपर्यंत दर्शन रोखण्यात आले आहे.

मंदिराच्या कार्यकारी अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे दोन मुख्य पुजारी, आठ सहकारी पुजारी आणि दोन गार्ड कोविड १९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंदिरात भाविकांसाठी दर्शनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भाविकांना मंदिरात दाखल होण्यास परवानगी नसली तरी मंदिरातील दररोजची पूजा मात्र नित्यनेमाने सुरूच राहील.

पद्मनाथस्वामी मंदिर २६ आॅगस्टपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले होते़ दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी कोविड १९ चे कडक नियम लागू करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांना एक दिवस अगोदर आॅनलाईन बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच, दर्शनासाठी येताना आधार कार्ड आणि आॅनलाईन बुंिकगची एक प्रत सोबत बाळगण्यास सांगण्यात आले होते.

मी माझा मित्र गमावला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या