30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयकुंभमेळ्यात १०२ भाविकांना कोरोना

कुंभमेळ्यात १०२ भाविकांना कोरोना

एकमत ऑनलाईन

हरिद्वार : येथील कुंभमेळ्यात दुसरे शाहीस्रान सोमवारी पार पडले. कोरोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना आता आणखी एक चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात दुस-या शाहीस्रानानंतर १०२ साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरे शाही स्रान पार पडले. पवित्र स्रानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झाले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून, प्रचंड गर्दीत कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची त्रेधातिरिपट उडत आहे. कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्रान पार पडले. गंगेतील दुस-या पवित्र स्रानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

ना मास्क, ना थर्मल स्क्रिनिंग
कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात कोरोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आले नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केले जात नसल्याचे दिसले़ महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं.

उत्तराखंडमध्ये रुग्णवाढ
इतर राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. राज्यात २ हजार ५६ रुग्ण उपचार घेत असून, शाहीस्रानाच्या पूर्वसंध्येला ३८६ नवीन रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुंभमेळ्यात आढळून आलेल्या करोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचीही चिंता वाढली आहे. पहिल्या शाहीस्रानाला ३२ लाख भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. तर तिसरे शाहीस्रान बुधवारी होणार आहे.

कोर्ट सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या