22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयफेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना संपुष्टात येणार - शासकीय समितीचा अंदाज

फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना संपुष्टात येणार – शासकीय समितीचा अंदाज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने रविवार दि़ १८ ऑक्टोेबर रोजी केला आहे. भारतात कोरोना संक्रमणाने आपला सर्वोच्च टप्पा पार केल्याचा समितीने केलेल्या दाव्यानुसार, भारतात करोनारुग्णांची संख्या १०.६ दशलक्ष अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा कयासही या समितीने बांधला आहे़ उल्लेखनीय म्हणजे, भारतात सध्या एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ७५ लाखांच्या जवळपास पोहचली आहे़ कोरोना व्हायरसपासून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत, असा सल्लाही समितीने यावेळी दिला आहे.

आतापर्यंत १.१४ लाख रुग्णांचा मृत्यू
कोरोना स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांच्याकडून या समितीचे गठण करण्यात आले होते. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात २५ लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात एव्हाना १.१४ लाख कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे़

लसीकरण नियोजनाचे आदेश
कोविड १९ प्रतिबंधात्मक लस सर्वांना वेगाने उपलब्ध होईल, अशा व्यवस्थेवर काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्या असून, लस वितरणाचे नियोजन करताना देशाची भौगोलिक रचना आणि विविधता लक्षात घेण्याचे आदेशही मोदी यांनी अधिका-यांना दिले आहेत़ या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२२ ऑक्टोबर पाक विरोध दिवस म्हणून पाळावा ; पीओके तील नेता सज्जाद राजांचे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या