34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी घेतली कोरोना लस

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी घेतली कोरोना लस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केले, ते कौतुकास्पद आहे.” तसेच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी भारत बॉयोटेक कंपनीची कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एम्समध्ये कार्यरत असणाऱ्या पडुचेरी येथील सिस्टर पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोना लसीचा डोस दिला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

मोहोळ तालुक्यातील वाळू माफियांना दणका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या