30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयगंगा मातेच्या कृपेने कोरोना होणार नाही

गंगा मातेच्या कृपेने कोरोना होणार नाही

एकमत ऑनलाईन

डेहराडून : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. काही शहरांमध्ये जमावबंदीसह रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपनेते तीरथ सिंह रावत यांनी अजब दावा केला आहे.

कुंभमेळ्यात शाही स्रानासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे. त्याचवेळी कुंभमेळ्यातील सहभागी अनेक भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर रावत म्हणाले की, गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यातील १८ हजार १६९ भाविकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

गंगा मातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही. कारण गंगा नदी अविरतपणे वाहत असते. गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्रानासाठी जावे, असा अजब दावा तीरथ सिंह रावत यांनी केला आहे. तसेच कुंभमेळ्याची तुलना मरकजशी करू नये. असे करणे चुकीचे असल्याचा सल्लाही रावत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

अनेक देशांमधील लसी भारतात मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या