24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाची तिसरी लाट ९८ दिवसांची?

कोरोनाची तिसरी लाट ९८ दिवसांची?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यूकेमध्ये कोरोनाच्या थर्ड वेव्हची म्हणजे तिस-या लाटेची सुरूवात झाली आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे संक्रमण इथे वाढताना दिसत आहे. भारतात कोविडच्या दुस-या लाटेत डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त संक्रमणाचे कारण ठरला होता. त्यामुळे भारतातही तिस-या लाटेची भीती कायम आहे. एक्सपर्ट सांगतात की, दुसरी लाट ही ११ दिवसांची होती आणि तिसरी लाट ९८ दिवसांची असेल. आतापर्यंतचे अंदाज सांगत आहे की, यूकेमध्ये याची सुरूवात झाली आहे आणि भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते.

कोविड एक्सपर्ट डॉ. अंशुमान कुमार म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ११० दिवसांची होती. महाराष्ट्रात याचा प्रभाव कमी झाला त्यानंतर दिल्ली, यूपी, बिहार, बंगालमध्येही दुसरी लाट कमी झाली. हा व्हायरस नॅच्युरल नाहीये, हा एक बायोइंजिनिअर व्हायरस आहे. त्यामुळे यासाठी लावले जाणारे अंदाजही बरोबर ठरत आहे. कुमार म्हणाले की, यूकेमध्ये तिसरी लाट सुरू होऊन १७ ते १८ दिवस झाली आहेत. त्यानंतर दीड-पावणे दोन महिन्यांनी भारतात नवीन लाट येईल. ही लाट ९८ दिवस राहील. ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास सुरू होऊ शकते. ते म्हणाले की, चिंतेची बाब ही आहे की, नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लस अजूनही पसरलेला आहे.

तिसरी लाट टाळता येणे आपल्या हातात : एम्स
तिस-या लाटेबाबत कोविड एम्सचे कोविड एक्सपर्ट डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, तिसरी लाट दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे व्हायरसची बिहेविअर, जे आपल्या हातात नाही. दुसरी बाब म्हणजे मनुष्याचे बिहेविअर, जे आपल्या हातात आहे. ज्याप्रमाणे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी दिसत आहे. ही फार फार चिंतेची बाब आहे. यातून हे स्पष्ट दिसते की, मनुष्यांचे बिहेविअर व्हायरसला पसरण्यासाठी म्यूटेड होण्यासाठी आणि नव्या व्हेरिएंटला वाढण्यासाठी संधी देणारे आहे. जर अशीच स्थिती राहिली तर तिसरी लाट जास्त घातक ठरेल.

गर्दी टाळणे गरजेचे
डॉ. नीरज म्हणाले की, अजूनही देशभरातून ४० हजार नव्या केसेस समोर येत आहेत. हे व्हायरसचे संक्रमण आहे, जे केवळ दिल्लीमध्ये कंट्रोल केल्याने थांबणार नाही. इथेही अजूनही रोज १०० रूग्ण आढळत आहेत. सत्य हे आहे की, देशातील दुसरी लाट अजून संपलेली नाही. ते इंग्लंडचे क्रिकेटर पॉझिटिव्ह आल्याचे सांगत म्हणाले की, जर बायो बबलमध्ये राहूनही हे लोक संक्रमित होऊ शकतात तर मनालीतील गर्दीत लोक संक्रमित कसे होणार नाहीत?.

लसीकरणाची गती वाढवावी
तर कुमार म्हणाले की, तिसरी यावरही अवलंबून आहे की, येणा-या एका महिन्यात किती वेगाने व्हॅक्सीनेशन होते. जर व्हॅक्सीनेशन वेगाने केले गेले तर तिसरी लाट ब-याच प्रमाणात कंट्रोल करता येईल. इतकेच नाही तर डॉक्टर म्हणाले की, आतापर्यंत अनेक रिसर्चमध्ये बघण्यात आले की, काही लोकांना व्हॅक्सीन घेतल्यावरही कोरोनाची लागण होत आहे. असे लोक संक्रमित झाले तर त्यांच्यावर प्रभाव कमी होईल. पण त्यांच्या संपर्कात येणारे संक्रमित होतात. त्यांच्यात म्यूटेशनचा धोकाही असतो.

राणेंना कॅबिनेट, डॉ. कराड, पाटील, पवार नवे राज्यमंत्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या