मुंबई: भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. आता देशातील बड्या कार्पोरेट कंपन्यांही आता आपल्या कर्मचा-यांच्या लसीकरणाची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. देशातील रिलायन्स, टाटा तसेच वेदान्ता आदी तसेच इतरही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळामध्ये कर्मचा-यांच्या लसीकरणाची चर्चा सुरु केली आहे. त्यासाठी लस निर्मिती कंपन्यांकडून लसींच्या खरेदीचीही योजना तयार केली जात असल्याची चर्चा आहे. देशात तयार होणा-या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या विक्रीचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. सरकारने लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योध्यांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येईल तर दुस-या टप्प्यात ३० कोटी लोकांपर्यंत ही लस पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे.
खासगी कंपन्यांकडूनही तयारी सुरु
बड्या कार्पोरेट कंपन्यांनी आता थेट लस निर्माती कंपन्यांशीच चर्चा सुरु केल्याचेही सांगण्यात येत आहे. आपल्या कर्मचा-यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्याचे त्यांचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
मोठी रक्कम मोजण्याची तयारी
वेदान्ता कंपनीच्या एका अधिका-याने कंपनी आपल्या कर्मचा-यांसाठी कोरोनाच्या लसीचे २५ हजार डोस खरेदी करण्याची योजना तयार करत असलेएाउायाचे सांगितले आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वातील जेएसडब्ल्यू ग्रुपने आपल्या ५५ हजार कर्मचा-यांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यासाठी लस निर्मिती कंपन्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. या लस निर्मीती कंपन्यांना आपल्या लसींची विक्री खासगी बाजारात करण्याला अद्याप मान्यता नाही. केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीचे १.१ कोटी डोस हे जवळपास प्रत्येकी २०० रुपयांना तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे ५५ लाख डोस हे २९५ रुपये प्रति डोस या किंमतीत खरेदी करत आहे. अशा परिस्थितीत भारतीय खासगी कंपन्यांना या लसीच्या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.
पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ