34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयराफेल व्यवहारात भ्रष्टाचार; फ्रान्समधील मीडियाच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक

राफेल व्यवहारात भ्रष्टाचार; फ्रान्समधील मीडियाच्या दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या काँग्रेसने पुन्हा एकदा आरोप केला आहे. हा मुद्या पुन्हा एकदा समोर आला असून, राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थाला डॅसॉल्टने ५ लाख युरो गिफ्ट म्हणून दिल्याचे वृत्त फ्रान्समधील माध्यमांनी दिले आहे. यावरून काँग्रेसने आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये याबाबत केलेले सगळे ट्विट्स खरे होते, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी याप्रकरणी चौकशी जाहीर केली पाहिजे, अशी देखील मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. फ्रान्सच्या पब्लिकेशन मीडियापार्टने दावा केला आहे की, २०१६ मध्ये जेव्हा भारत-फ्रान्स यांच्यात राफेल लढाऊ विमानाबाबत करार झाला, त्यानंतर डॅसॉल्टने भारतात एका मध्यस्थाला ही रक्कम दिली. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा फ्रान्सच्या अ‍ॅण्टी करप्शन एजन्सीने डॅसॉल्टच्या खात्यांचे आॅडीट केले, असे काँग्रेसने ट्विटद्वारे म्हटले आहे.

राहुल गांधींनी केले होते सत्य उघड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये याबाबत केलेले सगळे ट्विट्स खरे होते, मात्र याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याने सदर भ्रष्टाचार उघड झाला नव्हता़ राहुल गांधींनी २०१८ मध्ये जी भूमिका मांडली, की राफेलमध्ये फार मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला. त्यावेळेस देशात ही गोष्ट तितक्या पद्धतीने बाहेर येऊ शकली नाही. परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट झालेले आहे की, २०१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात जे राहुल गांधींचे ट्विट्स होते ते सगळे सत्य असल्याचे आज आंतरराष्ट्रीय मीडियाने स्पष्ट केले आहे़

आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ
फ्रान्समध्ये यावरून खळबळ उडालेली आहे. २८४ कोटींपेक्षा जास्त दलाली घेतल्याचे या निमित्त समोर आलेले आहे आणि सत्य हे सत्य आहे. राफेलमध्ये रेसकोर्स रोडपर्यंत हा मार्ग गेलेला होता भ्रष्टाचाराचा हे आता पुन्हा एकदा या निमित्त स्पष्ट झालेले आहे.

अनिल देशमुख दिल्लीला रवाना; सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या