22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयदेशातला सर्वांत मोठा कार चोर पोलिसांच्या जाळ्यात

देशातला सर्वांत मोठा कार चोर पोलिसांच्या जाळ्यात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या कार चोराला पकडत एक नवा विक्रम गाठला आहे. देशातील सगळ्यात मोठा कार चोर अनिल चौहानला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या चोराने आतापर्यंत पाच हजारपेक्षाही जास्त कार चोरल्या आहेत. शिवाय त्याच्यावर हत्या आणि घुसखोरीचेही आरोप आहेत.

सेंट्रल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने अनिल चौहान या चोरास आसाममध्ये अटक केली आहे. माहितीनुसार अनिल मागल्या २७ वर्षांपासून गुन्हेगारी आणि चोरी, घुसखोरी करत आहे. १९९० मध्ये सगळ्यात जास्त मारुती कार चोरी झाल्या होत्या. तब्बल ८०० मारुती कारची चोरी त्यावेळी झाली होती. अनिल या कार्स जम्मू कश्मीर, नेपाळ आणि उत्तर पूर्व राज्यांमध्ये विकायचा.
अनिल चौहान आसाम सरकारमधला सगळ्यात मोठा ए क्लास कॉन्ट्रॅक्टर होता. ईडीच्या कार्यवाहीनंतर त्याच्याविरूगद्ध कार्यवाही करून त्याची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली होती. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याजवळून ६ पिस्टल, ७ कारतूस आणि चोरीची एक बाईक व कार जप्त केली आहे.

चोरीच्या दुनियेतील बादशाह
१९९० च्या काळात ऑटो रिक्शा चालवणारा अनिल नंतर गुन्हेगारीच्या दुनियेतील मोठा बादशाहाच झाला. त्याने बिनधास्त कार चोरीला सुरूवात केली. सात वर्षाआधीही या चोराला आसाम पोलिसांनी पकडले होते. त्याचे कार चोरीचे नेटवर्क दिल्लीपासून पसरत थेट आसाम ते महाराष्ट्रात जाऊन पोहोचले होते. अनेक राज्यांत अनिलवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासानंतर अनिलने तब्बल ४५५२ कार चोरी केल्याचे कबुल केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या