22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये देशाचे पहिले फुल आर्म ट्रान्सप्लांट

केरळमध्ये देशाचे पहिले फुल आर्म ट्रान्सप्लांट

एकमत ऑनलाईन

कोची : केरळच्या कोची येथील एका खासगी रुग्णालयात देशातील पहिले फुल आर्म ट्रान्सप्लांट करण्यात यश संपादन केले. ज्या रुग्णावर हे प्रत्यारोपण करण्यात आले, त्याचे नाव युसूफ हसन सईद आहे. तो इराणचा आहे. विजेच्या धक्क्यामुळे त्याने आपले दोन्ही हात गमावले होते.

२९ वर्षीय युसूफ हसनला रस्ते अपघातात ब्रेन डेड झालेल्या महिला डोनरचे हात लावण्यात आले. डॉक्टरांच्या मते, त्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. युसूफ हसन २०१९ मध्ये एका भिंतीला ड्रिल करत होता. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचे दोन्ही हात कोप-यापासून कापले.

३ वर्षांनंतर प्रत्यारोपणासाठी नोंदणी
सर्जरीचे नेतृत्व करणा-या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. अय्यर यांनी सांगितले की, युसूफ यांना शस्त्रक्रियेनंतर ३ आठवड्यांनी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सर्जरीचे नेतृत्व करणा-या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. अय्यर यांनी सांगितले की, युसूफ यांना शस्त्रक्रियेनंतर ३ आठवड्यांनी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या