28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयसायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला; कपलचा होईल 'खपल' चॅलेंज

सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला; कपलचा होईल ‘खपल’ चॅलेंज

एकमत ऑनलाईन

फोटो मार्फिंग केले जातात़ पॉर्न साईटवर टाकले जातात; फोटो भलत्या लोकांच्या हाती लागले तर त्यातून कुटुंबामध्ये चारित्र्याचा संशय घेतला जाऊ शकतो

पुणे: सध्या फेसबुकवर कपल चॅलेज ठेवण्यात आले असून त्याला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जात आहे. याबाबत पुणे सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. तुम्ही पाठविलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे ट्विट सायबर पोलिसांनी केले आहे.

सध्या फेसबुक, ट्विटरवर वेगवेगळी चॅलेज दिली जात आहे. त्यात बुधवारपासून फेसबुकवर असंच एक #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यात पतीपत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. लोक पतीपत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेले असताना काढलेले, तसेच लग्नाचा वाढदिवस अशा प्रसंगी काढलेले फोटो फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे.

या कपल चॅलेजवाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेज न करो़ केला तर कपलचा खपल चॅलेज होईल, असा इशारा पुणे सायबर पोलिसांनी दिला आहे. अनेकदा सोशल मिडियावर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हे फोटो मार्फिंग केले जातात़ पॉर्न साईटवर टाकले जातात. अनेकदा बदला घेण्यासाठी या फोटोचा उपयोग केल्याचे दिसून आले आहे. अनेकदा असे फोटो भलत्या लोकांच्या हाती लागले तर त्यातून कुटुंबामध्ये चारित्र्याचा संशय घेतला जाऊ शकतो. त्यातून एखादी दुदैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे अशा चॅलेजवर फोटो टाकताना समोरच्याची खात्री असल्याशिवाय असे फोटो शेअर न करण्याची सूचना सायबर पोलिसांनी केली आहे. यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये असे फोटो मार्फिंग करुन ते पॉर्न साईटवर टाकले जातात़ त्याखाली महिला, तरुणींचा नंबर दिला जातो. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाल्याचे प्रकरणे समोर आली होती. काही जणांनी बदला घेण्यासाठी असे कृत्ये केली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या