36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयसमलिंगी विवाहाबाबत कोर्टाने केंद्राकडून मागितले उत्तर

समलिंगी विवाहाबाबत कोर्टाने केंद्राकडून मागितले उत्तर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायदा याअंतर्गत समलिंगी विवाहांना मान्यता देण्याची विनंती करणा-या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती राजीव सहाय एंडलॉ आणि न्या. आशा मेनन यांच्या पीठाने गुरुवारी यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावली आणि चार आठवड्यांच्या आत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. त्याशिवाय, याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्वतंत्र प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले.

समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर मानवाधिकार कार्यकर्ते अभिजीत अय्यर मित्रा व अन्य तीन जणांनी जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिला असला, तरी समलिंगी जोडप्यांना विवाह करणे कायद्याने शक्य होत नसल्याकडे या याचिकेत लक्ष वेधले आहे.

न्यायालयाने अन्य दोन याचिकांनाही या याचिकेसोबत जोडून घेतले आहे. यापैकी एका याचिकेत दोन महिलांनी विशेष विवाह कायद्यान्वये विवाह करण्याची परवानगी मागितली असून या कायद्यात समलिंगी विवाहाचा समावेश नसल्याच्या मुद्द्याला आव्हान दिले आहे. तर दुसरी याचिका दोन पुरुषांनी केली आहे. त्यांनी अमेरिकेत विवाह केला असून विदेशी विवाह कायद्यांतर्गत त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यास नकार देण्यात आला होता. तिन्ही याचिकांवर ८ जानेवारी २०२१ रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.

धक्कादायक! २०० रुपयांच्या वर्गणीसाठी आदिवासी कुटुंबांवर बहिष्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या