24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी-भारत बायोटेक

कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी-भारत बायोटेक

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : कोव्हॅक्सिन लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन लस घेतली असता वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत कोरोनाविरोधातील कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणे असणा-या १३० जणांची चाचणी केली आहे. गेल्या दोन आठवड्यात देशभरातील एकूण २५ ठिकाणी ही चाचणी पार पडली. चाचणीमध्ये सहभागी झालेल्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचा परवाना मिळालेल्या कोणत्याही कंपनीने संसर्गाविरोधात इतकी कार्यक्षमता दाखवलेली नसून यामुळे कोरोना संसर्गाचा दर कमी होण्यास मदत मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या सह-संस्थापक सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करत भारताला वैज्ञानिक दृढनिश्चय, क्षमता आणि वचनबद्धतेसह जागतिक नकाशावर ठेवल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हटले आहे.

२५ शहरांमधील १३० जणांवर चाचणी
भारत बायोटेकने लक्षणे असणा-या २५ शहरांमधील १८ ते १८ वयोगटातील एकूण १३० जणांवर वैद्यकीय चाचणी केली. यावेळी १२ टक्के लोकांना थोडा त्रास जाणवला तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना गंभीर त्रास जाणवला अशी माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी त्यांनी इतर लसींच्या तुलनेत प्रतिकूल परिणामाचा दर कमी असल्याचे म्हटले आहे.

अर्धापूर नगरपंचायत कार्यालयासमोर वंचितचे अर्धनग्न आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या