25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयकोव्हॅक्सिन कोरोनाच्या ब्राझील व्हेरियंटवरही प्रभावी

कोव्हॅक्सिन कोरोनाच्या ब्राझील व्हेरियंटवरही प्रभावी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताची स्वदेशी लस कंपनी असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा प्रभाव जगभरात दिसून येत असून, अनेक देशांनी कोव्हॅक्सिन लसीला प्रभावी लस म्हणून मान्यताही दिली आहे़ आता कोव्हॅक्सिन कोरोनाच्या ब्राझील व्हेरियंटवरही प्रभावी असल्याचा दावा सोमवार दि़ ३ मे रोजी आयसीएमआरने केला आहे़

भारताची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन ब्राझील व्हेरियंटच्या कोरोना विषाणूवरही प्रभावी असल्यादा वादा आयसीएमआरने केला आहे. कोव्हॅक्सिन युके व्हेरियंट, बी.१.१.७ आणि महाराष्ट्रातील बी.१.६१७ वरही कार्यक्षम असल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. कोव्हॅक्सिन भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून तयार केली आहे. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ विरोलॉजी आणि आयसीएमआरने ब्राझील व्हेरियंट बी़१.१२८.२ या कोरोना विषाणूवर सखोल अभ्यास केला.

यासाठी त्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस एका विषाणूबाधित व्यक्तीला दिले होते. त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूंशी लढण्याची क्षमता वाढल्याचे दिसून आले. ब्राझील व्हेरियंटला यापूर्वी बी.१.१.२४८ हे नावे देण्यात आले होते़ त्यानंतर त्यात बदल करत बी.१.१२८.२ यात वर्गीकरण करण्यात आले. हा व्हेरियंट पी १ आणि पी २ प्रकारातील असल्याचे मान्य केले होते़ मात्र आता हा विषाणू एकाच प्रकारचा असल्याचे समोर आले आहे. हा विषाणू ब्राझील आणि जगातील इतर भागात पसरला आहे.

कोव्हॅक्सिन विषाणूंची संख्या वाढू देत नाही
कोव्हॅक्सिन ही लस रासायनिक प्रक्रिया केलेल्या कोरोना विषाणू नमुन्यापासून तयार केली असून, त्यामुळे या विषाणूंची संख्या शरीरात वाढत नाही. दोन मात्रा तीन आठवड्यांच्या अंतराने दिली असता लसीतील विषाणू प्रथिने क्रियाशील बनून प्रतिकारशक्ती वाढवतात व पुढील संसगार्ला तोंड देण्यास शरीराला सज्ज करतात.

प्रतिकारशक्ती वाढवणारी लस
कोव्हॅक्सिन लसीच्या कार्यक्षमतेचा अभ्यासपूर्ण अहवाल प्रीपिंट सर्व्हर बायोआरस्किव्हमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. भारताची स्वदेशी लस म्हणून मान्यता पावलेली भारत बायोटेकची कोविड १९ प्रतिबंधक लस सुरक्षित असून, प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. त्याचे कुठलेही विपरित सहपरिणाम होत नाहीत, असा शिक्कामोर्तब लॅन्सेट इनफेक्शियस डिसिजेस जर्नलने यापूर्वीच केला आहे.

सौम्य लक्षणांत सिटी स्कॅन करू नका : एम्स
कोरोनाच्या नवीन लाटेमध्ये आरटी-पीसीआर चाचणीत संसगार्चा थांगपत्ता लागत नसल्याच्याही ब-याच घटना समोर आल्यात. त्यामुळे रुग्णांना सिटी स्कॅन करावे लागतेय. परंतु आता एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी अशा रुग्णांना इशारा दिलाय. सिटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवे. सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे.

छातीत दुखत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा
घरातील विलगीकरणात राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सॅच्युरेशन ९३ किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असेही रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे़

लसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या