26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयकोव्हॅक्सिनची किंमत जाहीर; भारत बायटेकने केली घोषणा

कोव्हॅक्सिनची किंमत जाहीर; भारत बायटेकने केली घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसींची किंमत केंद्र सरकारसाठी १५० रुपये तर राज्य सरकारांसाठी ६०० रुपये जाहीर केली असून खासगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये दर जाहीर केला आहे. दरम्यान, दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या लसीची किंमत कमी करावी अशी सूचना केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरमला केली होती.

देशभर कोरोना लसीकरण चालू आहे. सध्या ४५ वर्षावरील लोकांना कोरोना लस देत आहेत. लोकही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस घ्यायला जाताना दिसत आहेत. त्यानंतर १ मेपासून देशातील १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे.

सिरमने कोव्हिशील्ड लशी साठी केंद्राला १५० तर राज्यांना ४०० रुपये दर जाहीर केला असून खासगी रुग्णालयात ही लस ६०० रुपयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसींच्या किमतीवरून महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या लसीच्या किमती जाहीर केल्या आहेत. आता लस कंपन्या लसींच्या किमती आणखी कमी करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईतील मृत्यूंची संख्या लपवली जातेय -देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या