24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयनाकावाटे दिली जाणारी कोविड-१९ लस अंतिम टप्प्यात

नाकावाटे दिली जाणारी कोविड-१९ लस अंतिम टप्प्यात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणा-या कोविड-१९ लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे अशी दिलासादायक माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. कृष्णा एला यांनी दिली आहे.

डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे सबमिट करू. सर्वकाही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल आणि ही जगातील पहिली नैदानिकदृष्ट्या सिद्ध झालेली कोविड-१९ लस असेल असे कृष्णा एला यांनी म्हटले आहे. भारताच्या औषध नियंत्रक जनरल विषय तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकला त्यांच्या इंट्रानासल कोविड लसीसाठी फेज-३ बूस्टर डोस स्टडी’ साठी तत्त्वत: मान्यता दिली आहे, ही भारतातील याप्रकारची पहिलीच लस आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या