21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयकोविशिल्ड, कोव्हॅक्सिन महाग

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन महाग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. देशातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र तरी संभाव्य तिस-या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, जानेवारी ते जुलै या काळातील लसीचा दर अगोदर निश्चित झाला होता. मात्र, आता यापुढे भारतात देण्यात येणा-या लसीचे दर वाढले असून, पुढील महिन्यांपासून लसींसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

देशात लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यातच भारतात तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मजुंरी दिली आहे. सध्या देशातल्या नागरिकांना तीन प्रकारच्या लशी दिल्या जात आहेत. त्यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक व्ही या लशींचा समावेश आहे. दरम्यान मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसींना मंजुरी मिळण्याची अद्याप प्रतिक्षा आहे. दरम्यान, भारतात वापरण्यात येणा-या लसींचे दर जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यात या दरांमध्ये वाढ करण्यात आली.

याआधी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे २०० आणि २०६ रुपये मोजले जात होते. मात्र, या दरात आता वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे २०५ आणि २१५ रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे २०० आणि २०६ रुपये मोजले जात होते. मात्र, या दरात आता वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे २०५ आणि २१५ रुपये मोजावे लागणार आहेत.

कोविशिल्डच्या एका शिशीमागे १० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार
आता नव्या दरानुसार कोविशिल्ड लसीच्या १० डोस असलेल्या एक शिशी मागे सरकारला ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत, तर कोव्हॅक्सिन लसीच्या २० डोसच्या एका शिशी मागे १८० रुपये जास्तीची मोजावे लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली.

काक्रंबा येथील युवकाचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या