17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeराष्ट्रीयकोविशिल्ड लस परिणामकारकच!

कोविशिल्ड लस परिणामकारकच!

एकमत ऑनलाईन

पुणे : कोविशिल्ड लसीच्या चाचणीमध्ये परिणामकारकेतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीमुळे स्वयंसेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शुन्य आहे. तसेच, लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून, इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी झाली आहे, असे स्पष्ट करत आदर पुनावाला यांनी लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर केला.

अ­ॅस्ट्रॉझेनेका कंपनीने जाहीर केलेल्या निष्कर्षानंतर वाढीव चाचण्या घेणार का, या प्रश्नावर बोलताना पुनावाला म्हणाले, अतिरिक्त चाचण्यांची गरज नाही. लसीची परिणामकारकतेच्या पुरेशा चाचण्या झाल्या आहेत. संवादातील गोंधळामुळे लसींच्या परिणामकारकतेबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, भारतातील उत्पादनावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काही महिन्यांनी १८ वर्ष वयोगटाखालील स्वयंसेवकांमध्ये लसीच्या चाचणीला सुरूवात केली जाईल.

लसीचे वितरण कुठे आणि कसे होणार याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. सर्वांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल, असा दर कळविण्यात आला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. उत्पादन सातत्याने सुरू असल्याने लस वितरणामध्ये विलंब होणार नाही. दोन आठवड्यांनी मान्यता मिळाल्यास त्यादृष्टीने वितरण व डोसच्या संख्येत वाढ केली जाईल. पंतप्रधानांना लसींबाबत आधीपासूनच खुप माहिती होती. त्यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटले. त्यामुळे फार माहिती त्यांना द्यावी लागली नाही. लसीचे वितरण, नियमन ही पुढील आव्हाने असतील. कमीत कमी वेळेत आतापर्यंत झालेल्या उत्पादनाची त्यांनी प्रशंसा केली. आम्ही उत्पादन वाढविण्यासाठी उभा केलेला तिसरा प्रकल्पही पंतप्रधानांनी पाहिला. या प्रकल्पामुळे वर्षभरात अब्जावधी डोस तयार होतील.

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या