24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गायीचा हल्ला

गुजरातच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गायीचा हल्ला

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातमध्ये भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक सर्वसामान्य नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र आज व्हीआयपी व्यक्तीवर देखील भटक्या प्राण्याने हल्ला केला आहे. गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर एका भटक्या गायीने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहे.

गांधीनगर जिल्ह्यातील तिरंगा यात्रेत नितीन पटेल सहभागी झाले असताना ही घटना घडली. कार्यक्रमादरम्यान एका गायीने नितीन पटेल यांना जबरदस्ती धडक मारील. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. भटक्या प्राण्यांची दहशत आणि लोकांना जखमी करण्याच्या बातम्या रोज येत असतात, पण यावेळी खुद्द माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत अशीच घटना घडली आहे. अनेक घटनांमध्ये भटक्या जनावरांच्या हल्ल्यात लोकांना जीवही गमवावा लागला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या