18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेस आमदार अनंत पटेल यांच्यावर भ्याड हल्ला

काँग्रेस आमदार अनंत पटेल यांच्यावर भ्याड हल्ला

एकमत ऑनलाईन

नवसारी : गुजरातमधील नवसारी इथे काँग्रेस आमदार आणि आदिवासी नेते अनंत पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केले आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले आहे, गुजरातमधील पार-तापी नदीजोड प्रकल्पाविरोधात आदिवासी समाजासाठी लढणारे आमच्या पक्षाचे आमदार अनंत पटेल यांच्यावर भाजपने केलेला भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. हा भाजप सरकारचा राग आहे. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचेही ते म्हणालेत. या घटनेनंतर आमदाराच्या समर्थनार्थ जमाव रस्त्यावर उतरला आणि गोंधळ घातला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या