मुंबई : पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मुद्यावरून देशभरातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरू केली आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले आहे.
लोकसभेत उपस्थित झालेल्या पेन्शन स्कीमच्या (ईएसओपी) मुद्यांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारचे काही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. पेन्शन स्कीमचा (ईएसओपी) मुद्दा सभागृहात उपस्थित झाला असून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो आवर्जून नमूद करताना देशातील साठ लाख पेन्शनर्संनी एका दिवसाचे उपोषण केले होते.
पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल असेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समितीने एक अहवाल तयार केला आहे. त्याबाबतही गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने काहीही केलेले नाही ही बाबही सुळे यांनी निदर्शनास आणून दिली.