27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयदिव्यांग मुलीसाठी यंत्रमानवाची निर्मिती...

दिव्यांग मुलीसाठी यंत्रमानवाची निर्मिती…

एकमत ऑनलाईन

पणजी : आजारी पत्नी दिव्यांग मुलीला अन्न भरवू शकत नसल्याने मजूर पित्याचे हृदय व्यथित झाले. त्यातूनच, त्याने कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना मुलीला कुणाच्याही मदतीशिवाय अन्न भरविण्यासाठी यंत्रमानवाची निर्मिती केली.

बिपिन कदम असे या मजुराचे नाव असून, गोवा राज्य नावीन्यता परिषदेनेही त्याच्या या नावीन्यपूर्णतेचे कौतुक केले आहे. परिषदेने यंत्रमानवाला ‘माँ रोबो’ असे नाव दिले आहे. हा माँ रोबोच आता दिव्यांग मुलीला तिच्या आईप्रमाणे अन्न भरवीत आहे. यंत्रमानवाचे व्यापक स्तरावर व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी परिषदेने बिपीन कदम यांना आर्थिक सहाय्यही केले आहे. चाळीसवर्षीय कदम दक्षिण गोव्यातील पोडा तालुक्यातील बेथोरा गावाचे रहिवासी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या