22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयबेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-या मो. शरीफ यांना निमंत्रण

बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-या मो. शरीफ यांना निमंत्रण

एकमत ऑनलाईन

अयोध्या : अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी अर्थात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून, यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणा-या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आले आहे. ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केले आहे, असे राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.

दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनासाठी कोरोनाच्या उद्रेकामुळे कमीत कमी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापैकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.

मुलाच्या हत्येनंतर बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करायला सुरूवात
गेल्या २७ वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदूू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास २५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांचा एक मुलगा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होता. तो सुल्तानपूरमध्ये गेला असताना त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला. नातेवाईकांनी त्याचा बराच शोध घेतला, पण मृतदेह सापडला नाही. तेव्हापासून शरीफ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

२५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार
गेल्या २७ वर्षांपासून मोहम्मद शरीफ हिंदूू-मुस्लिम किंवा अन्य कोणताही धर्म न बघता बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास २५ हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. स्थानिक लोकांमध्ये ते शरीफ चाचा नावाने ओळखले जातात. जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत राहणार, कारण या सेवेमुळे मला आनंद मिळतो, असे शरीफ चाचा म्हणतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या