पाराओ : दिल्ली चलो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपसरकारकडून चालू आहे. शांततामय पद्धतीने आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांकडूनच पाण्याचे फवारे, अश्रुधर सोडण्यात आले. मात्र त्याला प्रतिकार करणा-या शेतक-यांवर जाचक कलमांखाली दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कृषि कायद्यांविरोधात हरियाणातून दिल्लीत चाललेल्या शेतक-यांवर हरियाणा सरकारने २६ नोव्हेंबर रोजी कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), कलम १४७ (दंगल), कलम १४९ (बेकायदा एकत्र येणे), कलम १८६ (सरकारी कामात अडथळा), कलम २६९ ( संसर्ग पसरवून लोकांचा जीव धोक्यात आणणे) या अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. भारतीय किसान युनियनचे राज्य प्रमुख गुरुनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे. पाराओ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व शेतकरी दिल्लीकड कुच करण्यासाठी अंबालातील मोहरा खेड्यात जमले होते.
पोलीस उपअधीक्षक राम कुमार यांनी याबाबत माहिती दिली. कुमार म्हणाले की, चारूनी यांना मोर्चा पुढे नेऊ नका असे सांगण्यात आले होते. काही पोलीस अधिकारी हल्ल्यातून वाचले आहेत. आंदोलकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कलम १८८ अन्वये त्यांच्यावर आज्ञाभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
अजिंठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार