25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeतंत्रज्ञाननोकऱ्यांचे अपडेट देणाऱ्या 'कंपनी'वरच आता 'नोकरकपाती'चे संकट

नोकऱ्यांचे अपडेट देणाऱ्या ‘कंपनी’वरच आता ‘नोकरकपाती’चे संकट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नोकऱ्यांचे अपडेट देणाऱ्या ‘कंपनी’वरच आता ‘नोकरकपाती’चे संकट ओढविले आहे. ‘त्या’ कंपनीला 960 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ती कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट कॉर्पची प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असणाऱ्या लिंक्डइन. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, ‘लिंक्डइन’ने त्यांच्या 960 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीरडून जगभरातील त्यांच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे. जगभरात कोरोनाच्या संक्रमणामुळे रिक्रूटमेंट प्रोडक्ट्सची मागणी कमी झाली असून एखाद्या कंपनीस योग्य उमेदवाराची आणि एखाद्या व्यक्तीस त्याच्या क्षमतेनुसार नोकरी संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी ‘लिंक्डइन’ या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातोय. मात्र, सेल्स आणि हायरिंग डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.

‘लिंक्डइन’ कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर हि सविस्तर माहिती दिली आहे. लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन रॉसलान्सकी यांनी सांगितले कि, कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना 10 आठवड्यांचा पगार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वर्षाअखेरपर्यंत आरोग्य विम्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. तसेच भविष्यात नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण झाल्यास ‘या’ कर्मचाऱ्यांचा प्रथम विचार केला जाणार आहे, असे आश्वासन कंपनीकडून दिले आहे.

रॉसलान्सकी म्हणाले कि, आम्ही केवळे एवढी नोकरकपात करत असून या कर्मचाऱ्यांना अद्याप सांगितले नाही आहे, मात्र त्यांना कंपनीकडून दिलेले फोन्स, लॅपटॉप आणि नवीन खरेदी केलेली उपकरणं स्वत:कडे ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. यामुळे त्यांना करिअरमध्ये बदल करताना वर्क फ्रॉम होम करतेवेळी मदत होईल. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन काळात लिंक्डइनचा खूप कमी वापर झाला आहे. ज्यामुळे कंपनीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कंपनी या काळात नवीन नोकरी देऊ शकत नाही. परिणीमी, नोकरकपात केली जात आहे. त्यामुळे लिंक्डइनच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ज्या कंपन्यांवर या कपातीमुळे परिणाम होणार आहे, त्यांना या आठवड्यात सूचित केले जाणार आहे, असेजी कंपनीने सांगितले आहे.

‘लिंक्डइन’ हि कंपनी मोठ्या प्रमाणात नोकरीची माहिती देणारे उत्तम व्यासपीठ होते. त्यामुळे ‘लिंक्डइन’ने अनेक देशात स्वतःची विश्वासअहर्ता जपून आहे. मात्र, त्यांनी घेतलेल्या कर्मचारी कपातीचा निर्णय अनेकांना विचार करावा लावणारा आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. केवळ कर्मचाऱ्यांना न काम करता पगार देणे कंपनीला परवडणारे नाही. त्यामुळे कंपनी मध्यम मार्ग म्हणून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेत आहे. अनेकांना नोकरी मिळवून देणाऱ्या ‘लिंक्डइन’ कंपनीवर कर्मचारी कपातीची हि वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी असली तरी आता नोकरी कायमस्वरूपाची नाही, हेच आता सर्व कर्मचारी आणि उमेदवारांना समजले आहे. यावर देशातील सरकारने आणि जागतिक स्तरावरील संघटना मिळून वेरोजगारी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. तरच आर्थिक घडी नीट होऊ शकेल. अन्यथा, कंपनीचे मालक लोक संकटात चांदी करून भावनिक अहवानाद्वारे ‘श्रीमंत’ यादीत झळकले तर कोणाला नवल वाटायला नको.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या