16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयमोदी यांनी निर्माण केलेल्या संकटात देश अडकलाय-राहूल गांधी

मोदी यांनी निर्माण केलेल्या संकटात देश अडकलाय-राहूल गांधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरवरून हल्ला चढवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. देशभरात कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या, घसरलेला जीडीपी, चीनची घुसखोरी या मुद्द्यांवर ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यांनी निर्माण केलेल्या संकटात देश अडकल्याची टीका राहुल यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी सहा मुद्दे मांडले आहेत. जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. गेल्या 45 वर्षात आता सर्वाधिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. सुमारे 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारांना जीएसटीचा थकीत निधी अद्याप दिलेला नाही. देशात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. हिंदुस्थान-चीन सीमारेषेवर चीनकडून कुरापती सुरू आहेत. या मुद्द्यांवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदी यांनी निर्माण केलेल्या संकटात देश अडकल्याची टीका त्यांनी केली आहे.

सर्वसामान्य माणसांना जीडीपी घसरल्यामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांबाबत माहिती नसेल. मात्र, नोटबंदी, अयोग्य पद्धतीने आणलेला जीएसटी, लॉकडाऊन लागू करत केलेली देशबंदी यासारख्या डिजास्टर स्ट्रोकला मास्टर स्ट्रोक सांगणे खोटारडेपणा असल्याचे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी देवाला दोष देणे अयोग्य आहे. याआधी 30 ऑगस्टला काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात देशाची अर्थव्यवस्था गेल्या 40 वर्षात मोठ्या मंदीत असल्याचे दाखवले होते. अर्थव्यवस्था ढासळल्याचा दोष सरकार देवाला देत आहे. मात्र, नोटबंदी, अयोग्य जीएसटी आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ढासळल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

बच्चन कुटुंबाच्या घरात आणखी एका कारची एंट्री

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या