18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रसीआरपीएफचा प्रत्येक आघाडीवर झेंडा

सीआरपीएफचा प्रत्येक आघाडीवर झेंडा

एकमत ऑनलाईन

नांदेड : सीआरपीएफवर देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी होती. त्यानंतर दंगली रोखणे, नक्षलवाद्यांशी लढा, ईशान्येकडे काम करण्याची, काश्­मीरमध्ये काम करण्याची जबाबदारी आली. सीआरपीएफ जवानांनी प्रत्येक गरजेनुसार स्वत:ला त्या कार्यानुरूप बदलत प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचे चांगले काम केले.

प्रत्येक आघाडीवर सीआरपीएफचा विजयाचा झेंडा अभिमानाने उंचावला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. केंद्रीय सशस्त्र पोलिस बलातर्फे सुरु असलेल्या अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान-२०२१ अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात १ कोटीव्या वृक्षाचे रोपण केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सीआरपीएफचे महा संचालक आणि वरिष्ठ अधिका-यांसह जवानही उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, अनिर्बंध विकासकामांमुळे जागतिक पर्यावरणाची मोठी हानी झालेली आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे दोन धोके प्रत्येक देशाचे शत्रू आहेत. गेल्या काही काळापासून अतिवृष्टी, दुष्काळ, भूस्खलन यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. यांचे मूळ कारण हवामान बदल हेच आहे.

सीआरपीएफ शिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पना केली जाऊ शकत नाही, हे वास्तव आहे. संपूर्ण राष्ट्राला सीआरपीएफ जवानांच्या त्यागाचा, बलिदानाचा आणि समर्पणाचा अभिमान आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यात सीआरपीएफचे योगदान उल्लेखनीय आहे. सीआरपीएफच्या समर्पित आणि उल्लेखनीय योगदानाशिवाय देशाचा विकास आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनणे शक्­य नाही, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या