नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कालच १०० डॉलर प्रति बॅरल खाली आल्या होत्या. आजही यामध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
डबल्यूटीआई क्रूड १.०२ डॉलरच्या पडझडीनंतर ९४.८२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर ब्रेंट क्रूड ९८.६० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.