21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयकच्चे तेल स्वस्त; दरवाढ जबरदस्त

कच्चे तेल स्वस्त; दरवाढ जबरदस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आज देशात इंधनदर गगनाला भिडले असून, केंद्र सरकार याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरवाढीचे कारण समोर करीत आहे़ मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जून २०१४ च्या तुलनेत प्रति बॅरल १२०० रुपयांनी स्वस्त झाली आहे़ असे असतानाही इंधनाचे दर सातत्याने वाढवल्या जात आहे़ वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील या वाढीमागील कारण सांगितले जात आहे. ३ मे रोजी भारतीय बाजारपेठेत प्रती बॅरेल ६५.७१ डॉलर होती. आता त्याची किंमत वाढून ७१ डॉलर प्रती बॅरेल झाली आहे.

पेट्रोलनंतर आता डिझेलचे दरही १०० रुपये प्रती लीटरच्या पुढे गेले आहेत. शनिवारी डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये डिझेल १०० रुपये ६ पैसे आहे. त्याचबरोबर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या पाच राज्यांत यापूर्वीच पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

अशी आहे आकडेवारी
मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०९ डॉलरवर पोहोचली होती. त्यावेळी एक लिटर पेट्रोलची किंमत ७० ते ७२ रुपयांच्या दरम्यान होती. किंमती वाढतात़ तेव्हा आणखी एक युक्तिवाद केला जातो. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य. हा मुद्दा जर आपण पाहिला तर जून २०१४ मध्ये एका डॉलरची किंमत ५८.८१ रुपये होती. या अर्थाने, त्यावेळी क्रूड ६ हजार ३२६ रुपये १९ पैसे प्रति बॅरल होते. त्याचबरोबर आज क्रूडची किंमत प्रति बॅरल ५ हजार १९९ रुपये ४६ पैसे आहे. म्हणजेच जून २०१४ च्या तुलनेत आजही क्रूड प्रति बॅरल एक हजार रुपयांहून अधिक स्वस्त आहे.

३९ दिवसांत सतत वाढ
दोन मे रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दोन दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या. गेल्या ३९ दिवसांत दिल्लीतच पेट्रोल ५.५७ रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेल ६.०७ रुपयांनी महागले आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६ रुपये १८ पैसे होती डिझेलची किंमत ८७.०४ रुपयांवर गेली.

एक्साईज शुल्क दहापटीने वाढले
जून २०१४ मध्ये पेट्रोलच्या एका लिटरवरील एक्साईज शुल्क साडे नऊ रुपये होते तर डिझेलवर ते साडे तीन रुपये होते. सध्या ते चार ते दहा पट वाढले आहे. आज एक लिटर पेट्रोलवर ३२.९ रुपये आणि डिझेलवर ३१.८ रुपये एक्साईज ड्युटी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे राज्यांनीही गेल्या पाच वर्षात विक्रीकर आणि व्हॅट वाढविला आहे. १६ जून २०१७ पासून देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. तेव्हापासून केंद्र आणि राज्यांनी आपापल्या करांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. हे दिल्लीतील पेट्रोल दराच्या उदाहरणावरून समजू शकते.

सचिन पायलट गटाचा फोन टॅपिंगचा आरोप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या