32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयवैवाहिक जोडीदाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे ही क्रूरता

वैवाहिक जोडीदाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे ही क्रूरता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपल्या वैवाहिक जोडीदाराची समाजात बदनामी करणे ही एकप्रकारे मानसिक क्रुरता असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याप्रकरणात एका लष्करी अधिका-याचा घटस्फोटही मंजूर केला आहे. करताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे मत नोंदवले आहे. वैवाहिक जोडीदाराविरोधात मानहानीकारक तक्रारी करणे आणि त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे मानसिक कौर्यासमान असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने तुटलेल्या नात्याला मध्यमवर्गाच्या वैवाहिक जीवनातील सामान्य तक्रार सांगत आपल्या निर्णयात त्रुटी ठेवली आहे, असेही न्यायमूर्ती एस के कौल यांच्या नेतृत्त्वाखाली पीठाने म्हटले आहे.

संबंधित लष्करी अधिका-याने सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या आपल्या पत्नीवर मानसिक क्रूरतेचा आरोप करत घटस्फोट मागितला होता. दोघांचा विवाह २००६ मध्ये झाला होता. मात्र विवाहानंतर अवघ्या काही महिन्यातच २००७ मध्ये दोघे वेगळे राहू लागले होते. मात्र वेगळे राहिल्यानंतरही पत्नी अनेक ठिकाणी पतीबद्दल बदनामीकारक मत व्यक्त करीत होेती.

संबंधित लष्करी अधिका-याने त्याविरोधात उत्तराखंडच्या उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्चन्यायालयाने तुटलेल्या नात्याला मध्यमवर्गाच्या वैवाहिक जीवनातील सामान्य तक्रार सांगत घटस्फोट फेटाळला होता. त्यानंतर अधिका-याने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. याचिकेत पत्नीद्वारे विविध ठिकाणी माझ्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असे बोलले गेल्याचे सांगत तिच्यावर मानसिक क्रूरतेचा आरोप केला होता. हे निश्चितच प्रतिवादीकडून अपीलकर्त्याविरोधातील क्रूरतेचे प्रकरण आहे. त्यामुळे अशा प्रकारात अपीलकर्त्याला आपला विवाह संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे, असा निकाल देत प्रतिवादीचा वैवाहिक हक्क कायम ठेवण्याचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नाकारला.

पीडीत पक्षाकडून माफीची अपेक्षा करणे चुकीचे
जोडीदाराचे सहकारी, वरिष्ठ आणि समाजामध्ये त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचेल, असे मतप्रदर्शन दुस-या जोडीदाराकडून होत असेल तर पीडित पक्षाने अशी वागणूक माफ करावी ही अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

अखेर नवदीप कौरला जामिन मंजूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या