22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयशुगर फ्री आंब्याची लागवड; १६ वेळा बदलतो रंग

शुगर फ्री आंब्याची लागवड; १६ वेळा बदलतो रंग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंबा हा सर्वांनाच आवडतो. पण सध्या शुगर फ्री आंब्याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुशाहरी तालुक्यातील शेतकरी राम किशोर सिंह यांच्या बागेत हा शुगर फ्री आंबा पिकतो. तो आंब्यासारखा दिसत नसला तरी ती आंब्याचीच एक प्रजाती आहे, ज्याला अमेरिकन ब्युटी असे म्हणतात. मुझफ्फरपूर हे शहर खरे तर देश आणि जगभरात लिची या फळाच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता शुगर फ्री आंब्यामुळे ते खूप चर्चेत आलं आहे.

डायबेटिसच्या रुग्णांना इच्छा असूनही आंबा खाता येत नाही. मात्र, आता बिहारमधील या शेतक-याने केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे रुग्णांनाही आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. शेतकरी राम किशोर सिंह यांच्या बागेत शुगर फ्री आंबा पिकतो.

या आंब्यामध्ये नेहमीच्या आंब्यासारखेच गुणधर्म आहेत. पण, हा गोडीला मात्र कमी आहे. कृषी विद्यापीठ समस्तीपूर आणि नॅशनल रिसर्च इन्स्टिटयÞूट ऑफ लिचीच्या शास्त्रज्ञांनीही त्याची चव चाखली असून, त्याची चव सामान्य आंब्यांपेक्षा कमी गोड आणि साखरमुक्त असल्याचें आढळले आहे.

हा आंबाही पिकेपर्यंत अनेकदा रंग बदलतो. आंबा झाडावरच असतो; पण तो हिरवा-पिवळा-लालसर होण्यापूर्वी हा आंबा १६ वेळा रंग बदलतो. पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग लाल होतो. बाजारात त्याची किंमतही जास्त असून, एका किलोला ४ हजार रुपये दर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या