22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकर्लीज रेस्टॉरंटच्या मालकाला सशर्त जामीन मंजूर

कर्लीज रेस्टॉरंटच्या मालकाला सशर्त जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या मृत्युप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्स यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. बुधवारी गोव्यातील एनडीपीएस कोर्टाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. नन्स त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकत नाहीत आणि गोव्याबाहेर जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

२३ ऑगस्टला गोव्यात भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन झाले. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी खून झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि फोगाट यांचे स्वीय साहाय्यक सुधीर सांगवान, कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन न्युन्सचे आणखी सहकारी सुखविंदर सिंग यांना अटक केली.

मंगळवारी फोगाटचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. दोघांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अटक केली होती आणि १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांची कोठडी संपली. त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या