24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयसध्या दोन लसींनाच प्राधान्य

सध्या दोन लसींनाच प्राधान्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या महामारीला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हे एकमेव मोठे शस्त्र मानले जात आहे. देशात सध्या १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे आणि या दरम्यान अनेक देशांनी कोविड-१९ विरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस भारतात कधी दिला जाईल, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन डोसच्या पूर्ण लसीकरणाला प्राधान्य आहे आणि ते चालूच राहील. या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रत्येकाचे लसीकरण पूर्ण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. कोविड-१९ वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ब्रीफिंगदरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सरकारच्या वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य सेवेच्या चर्चेत सध्या बूस्टर डोस हा मुख्य विषय नाही. सध्या दोन डोससह पूर्णपणे लसीकरण हे मुख्य प्राधान्य आहे.

देशभरात लसीचे ७७.२५ कोटी डोस
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात कोरोना लसीचे ७७ कोटी २४ लाख २५ हजार ७४४ डोस देण्यात आले आहेत. देशभरातील ५८ कोटी २६ लाख ६ हजार ९०५ लोकांनी एक डोस घेतला आहे, तर १८ कोटी ९८ लाख १८ हजार ८३९ लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या